Advertisement
पुणे : काँग्रेस राष्ट्रवादीकडे अनेक दिग्गज नेते आहेत, ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदावर राहिले आहेत, मग ते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का असा प्रश्न शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना केल्याचा गौप्यस्फोट दावा ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी केला आहे. यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, अरविंद सावंत यांच्या या दाव्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टीकरणं दिलं आहे. 'ते ' वक्तव्य अरविंद सावंत यांचं आहे. शरद पवार यांनी रिक्षावाला शब्द वापरला नाही. शरद पवार यांनी सर्वच गोष्टींचा आदर केला असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
अरविंद सावंत यांच्या या गौप्यस्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.शरद पवारांमुळे एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकल्याचा अप्रत्यक्ष दावा सावंत यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला शरद पवारांचा विरोध होता. रिक्षावाल्याचं नेतृत्व कसं मान्य करणार? काँग्रेस राष्ट्रवादीकडे अनेक दिग्गज नेते आहेत, मग ते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं पवार यांनी म्हटल्याचा दावा सावंत यांनी केला आहे.
