Advertisement
नागपूर : महाविकास आघाडीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना, 2024 पर्यंत आपल्याला महाराष्ट्राचं चित्र बदलेलं दिसेल. ठाकरे गटाचे काही लोक येत आहेत, येणारा लहान नेता आहे की मोठा हा प्रश्न नाही. ठाकरे गटातील नेते रोज त्यांना सोडून चालले हे महत्त्वाचं असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अशोक चव्हाणांवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काल अशोक चव्हाण यांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की, कालच्या सभेत त्यांना मोठी खुर्ची भेटली नाही. सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अपमान झाला. त्यांचे कार्यकर्ते सभेतून निघून गेले, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
