#

Advertisement

Monday, April 10, 2023, April 10, 2023 WIB
Last Updated 2023-04-10T11:56:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

आमच्या अंगाला भोकं पडणार नाहीत...अजित पवार यांच खणखणीत प्रत्युत्तर !

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची  मागणी करणं निरर्थक असल्याचं वक्तव्य एका मुलाखतीत केलं होतं. त्यानंतर  काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी 'लालची लोग' ट्विट करत शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. अलका लांबा यांचं ट्विट चर्चेत असल्याने अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. अलका लांबांच्या ट्विटवर अजित पवार भडकले. त्यांच्या ट्विटनं आमच्या अंगाला भोकं पडणार नाहीत, असं म्हणत अजित पवार यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. अदानींच्या सोबतचा तुमचा फोटो व्हायरल झालाय, असं म्हणताच अजित पवार भडकले. अदानींसोबतचाच आहे ना.. कोणी अंडरवर्ल्ड डॉनसोबतचा तर नाही ना.. लगेच कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करनं हे योग्य नाही, असं म्हणत अजित पवारांनी अदानींची पाठराखण केल्याचं पाहायला मिळाल‌ं.