#

Advertisement

Thursday, April 13, 2023, April 13, 2023 WIB
Last Updated 2023-04-13T10:43:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

रश्मी ठाकरे सुद्धा मैदानात उतरणार

Advertisement

मुंबई राज्यभरात पक्षबांधणीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता सभा घेत असून शिवसैनिकांशी संवाद साधत आहे. आता त्यांच्या मदतीला रश्मी ठाकरे सुद्धा मैदानात उतरणार आहेनाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची डागडुजी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी रश्मी ठाकरे नाशिकचा दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विस्कटलेल्या संघटनात्मक बांधणीसाठी रश्मी ठाकरे मैदानात उतरल्याचे सांगितले जात आहे. नाशिकमध्ये महिला मेळाव्यातून रश्मी ठाकरे या शक्तीप्रदर्शन करणार आहे. याआधीही रश्मी ठाकरे या नेहमी उद्धव ठाकरे यांच्यासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांना नेहमी हजर राहिल्या. पण, आता पक्षाची अवस्था पाहता रश्मी ठाकरे स्वत: लक्ष देणार आहे.