#

Advertisement

Thursday, April 13, 2023, April 13, 2023 WIB
Last Updated 2023-04-13T11:01:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

शरद पवार यांनी बोलंण टाळल्यानं पुन्हा गोंधळ

Advertisement


पुणे : राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला शरद पवार अनुपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. यावर आता शरद पवार यांनी स्वत: च स्पष्टीकरण दिलं आहे.राज्यातलं सरकार अस्थिर आहे का? राष्ट्रवादी
भाजपसोबत जाणार का असा प्रश्न विचारला असता, राहूल गांधींसोबत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला मला ही बोलवलं होत, पण मला इथे काही कामं होती. मी उद्या दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेणार आहे, आम्ही सगळे त्यांच्यासोबतच आहेत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे अजित पवार भाजपसोबत जाणार का? या प्रश्नावर मात्र शरद पवार यांनी बोलंण टाळल्यानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.