Advertisement
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधले अजित पवारांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष कविता अल्हाट यांच्या घरी अजित पवार सदिच्छा भेट देणार होता. तसेच चिखलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यालाही ते हजेरी लावणार होते. त्यानंतर माजी नगरसेविका शमीम पठाण यांच्या निवासस्थानी ईदनिमित्त सदिच्छा भेट देणार होते. मात्र, अचानक अजित पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी पित्ताचा त्रास झाल्यानं त्यांचा सातारा दौरा रद्द करण्यात आला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजप पक्षामध्ये प्रवेश करणारा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच अजित पवार यांनी त्यांचे सर्व कार्यक्रमक रद्द केले होते. यामुळे चर्चेला उधाण आले होते. मात्र, अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत याचा खुलासा केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी अचानक त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
