Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह जय श्रीराम म्हणत अयोध्येला रवाना झाले आहे. या दौऱ्यात भाजपचे नेते सुद्धा सामील झाले आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी दिल्लीला जाणार आहे. दिल्लीतून ते अयोध्येत जाणार असल्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांसह विमानाने अयोध्येला रवाना झाले आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर निघाले आहे. कर्नाटक निवडणूक समितीच्या बैठकीकरीता दिल्लीत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली येथून ते अयोध्येला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे अयोध्येत दिसणार आहे.
