#

Advertisement

Thursday, May 4, 2023, May 04, 2023 WIB
Last Updated 2023-05-04T10:11:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राज्यात 11 मे नंतर नवं सरकार स्थापन होणार? राजकीय तज्ज्ञांचा मोठा दावा

Advertisement

राजकीय तज्ज्ञांचा मोठा दावा

पुणे :  राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडणार याबाबत राजकीय तज्ज्ञही अनेक अंदाज वर्तवताना दिसत आहेत. अशातच आता कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्या एका ट्विटने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मेच्या आधी नक्की होतील, असा दावा त्यांनी केला आहे. यासोबतच नवीन सरकार स्थापनेबाबतही त्यांनी मोठं विधान केलं आहे. 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. पवारांच्या राजीनाम्याचे पडसाद महाविकासआघाडीवरही उमटले आहेत. यादरम्यान काँग्रेस आणि ठाकरे गटातला सुसंवाद चांगलाच वाढला आहे.