Advertisement
मुंबई, : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पक्षातील नेत्यांसोबत कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. या निर्णयानंतर कार्यकर्त्यांनी मुंबईतील वाय. बी सेंटरच्या बाहेरच उपोषण सुरू केलं. या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी खुद्ध शरद पवार आज आले होते.
पवारांनी कार्यकर्त्यांची भूमिका ऐकून, उद्या पक्षाचे काम कसे चालणार, यासाठी निर्णय घेतला आहे. आम्ही जोपर्यंत भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे आहोत, पक्ष शक्तिशालीपणे उभा करावा, हा त्याचा हेतू होता. पण ही गोष्ट खरी आहे, असा निर्णय घेत असताना आधी सहकाऱ्यांची चर्चा करावी लागते. पण मला खात्री होती, मी तुम्हा लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही हो कधी म्हटलं नसतं. आणि त्यामुळे तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेतला नाही. देशभरातून अनेक तुमचे सहकारी आले होते, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. बाहेरच्या लोकांशी चर्चा करून एक ते दोन दिवसांमध्ये निर्णय घेऊ. कार्यकर्त्यांची जी भावना आहे, ती दुर्लक्ष केली जाणार नाही. कार्यकर्त्यांची जी भावना आहे, ती दुर्लक्ष केली जाणार नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो, दोन दिवसांच्या नंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, दोन दिवस झाले, शरद पवारांनी आपल्या निर्णयावर मांडली स्पष्ट भूमिका.घेत आपली भूमिका मांडली.
