#

Advertisement

Tuesday, May 30, 2023, May 30, 2023 WIB
Last Updated 2023-05-30T10:21:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"मिंदे गटा"चे आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात : राऊत

Advertisement

मुंबई : राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप असताना आता नवनवीन दावे करण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटात असंतोष आहे. लवकरच याचा स्फोट होईल, असे म्हटले आहे. त्याचवेळी आता ठाकरे गटाकडून मोठा दावा करण्यात येत आहे. भाजपवर नाराज असलेले मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करताना गद्दारी करणाऱ्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडले जाणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत चर्चा सुद्धा झालेली नाही.निश्चित फॉर्म्युला तयार झालेला नाही. आत्ता खासदारकीच्या जागा आमच्याकडे जास्त आहेत. त्यामुळे आमच्या जागा कायम ठेवून शिल्लक जागा समान ठेवायच्या असा फॉर्म्युला झाल्यास  तोडगा निघू शकतो.  जागांची अदलाबदली देखील होऊ शकते. कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले.