#

Advertisement

Tuesday, May 30, 2023, May 30, 2023 WIB
Last Updated 2023-05-30T10:29:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण..., संभाजीराजेंनी पाठिंबा घेतला मागे

Advertisement

मुंबई : लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलच्या पाटील आडनावावरुन वाद सुरु असून मराठा संघटनांनी आक्षेप घेतला आहे. तिने पाटील आडनाव लावू नये अशी मागणी करण्यात येत आहे. गौतमीच्या आडनावावरुन वाद सुरु असताना संभाजीराजे छत्रपतीयांनी मात्र तिला जाहीर पाठिंबा दिला होता. पण आता मात्र संभाजीराजे यांनी तिला दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे. अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण अशा शब्दांत त्यांनी आपलं मत मांडलं आहे. 
"महिलांनी आपले गुण व कतृत्व दाखवायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. मराठा समाजातच नाही तर अनेक समाजातील लोकसुद्धा पाटील आडनाव लावतात. त्यामुळे पाटील हे आडनाव नसून तो किताब आहे. कलाकारांना सुरक्षा मिळायला पाहिजे", असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडलं होतं.