#

Advertisement

Thursday, May 11, 2023, May 11, 2023 WIB
Last Updated 2023-05-11T11:51:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राजीनामा आल्यावर.., देऊ नका असे सांगायला पाहिजे होते का ?

Advertisement

मुंबई :  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने राज्यपालांवर ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांनी घेतलेल निर्णय कायद्याला धरून नव्हते, असं स्पष्ट मत कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं. यावर बोलताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीचा निर्णय तेव्हा चुकीचा होता. आता त्याचं काय करायचंय? न्यायालयानं सगळं सांगितलं आहे. न्यायालयाच्या निकालापुढे मला काहीही बोलायचं नाही, असं म्हटलं आहे. 
मी राज्यपाल पदावरुन मुक्त झालो आहे. याला तीन महिने झाले आहेत. राजकीय प्रकणांपासून मी स्वतःला दूर ठेवतो. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आपला निर्णय दिला आहे. मी कायद्याचा विद्यार्थी नाही. मला केवळ संसदीय पद्धती माहिती आहेत. म्हणून त्यावेळी मी जे निर्णय घेतले ते विचारपूर्वक घेतले. माझ्याकडे कोणाचा राजीनामा आल्यावर मी देऊ नका असे सांगायला पाहिजे होते का? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर विश्लेषण करणे हे तुमचं काम आहे. हे माझं काम नाही," असे तत्कालीन  माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.