Advertisement
मुंबई : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी दिला नसता तर हे सरकार कदाचित परत आले असते, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कायदेशीरदृष्ट्या राजीनामा दिला ही चूक असू शकते, पण नैतिकता बघितली तर ज्या पक्षाने आणि माझ्या वडिलांनी ज्यांना सगळं दिलं त्यांच्यासाठी मी विश्वास आणि अविश्वास का दाखवू? असा सवाल करतानाच मी राजीनामा दिला नसता तर मी पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो, पण माझ्यासाठी ही लढत नाही, माझी लढाई राज्यासाठी आणि देशासाठी आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यपालांची भूमिका संशयास्पद म्हणण्याची गरज नसून ती अयोग्य ठरली आहे. राज्यपाल ही यंत्रणा आदरयुक्त होती, पण शासनकर्त्यांनी धिंडवडे काढले आहेत, ते पाहिल्यानंतर राज्यपाल यंत्रणा अस्तित्वात ठेवावी की नाही, याचा विचार केला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन राज्यपालांवर देखील निशाणा साधला.
