#

Advertisement

Thursday, May 4, 2023, May 04, 2023 WIB
Last Updated 2023-05-04T10:46:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

केंद्रीय उद्योग मंत्री राणे यांचे माजी मंत्री ढोबळे यांनी केले स्वागत

Advertisement

सोलापूर : मंगळवेढा तालुक्‍यातील बेरोजगार युवक, महिला यांना रोजगार व शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग निर्मिती वाढीस लागावी यासाठी मंगळवेढा येथील शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने कृषी उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, या मेळाव्याचे उद्‌घाटन केंद्रीय सूक्ष्म लघु उद्योगमंत्री नारायण राणे, भजपाचे प्रांतीय सदस्य तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत आज झाले. यावेळी राणे यांचे स्वागत करण्यासाठी खुद्द माजी मंत्री ढोबळे हे गेले होते.
मंगळवेढा येथे दरवर्षी दलित मित्र कदम गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी महोत्सवासोबत कृषी उद्योजक मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा व मंगळवेढा तालुक्‍यात अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणात संधी असून कच्चामाल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना त्याकडे दुर्लक्ष होत असते. केंद्र सरकारकडून अन्नप्रक्रिया उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात मदत केली जात असताना सोलापुरातील युवा उद्योजकांना याचा लाभ व्हावा, यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग उभे राहवेत, या उद्देशाने सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत माजी मंत्री ढोबळे यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून येथे फूड प्रोसेसिंग क्‍लस्टर उभा राहावा यासाठी प्रयत्न राहणार आहे. अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये नोकरीच्या मोठ्या संधी आहेत. मंगळवेढा ज्वारीला जिआय मानांकन असून ज्वारीवर अन्नप्रक्रिया करून लहान मुलापासून मोठ्यापर्यंत अनेक उत्पादने बनवली जातात, याबाबत आणखी काही उद्योग उभे करता येतील का, याबाबत उद्योग मंत्री राणे यांच्याशी चर्चा होणार असल्याचेही ढोबळे यांनी सांगितले.