#

Advertisement

Tuesday, May 23, 2023, May 23, 2023 WIB
Last Updated 2023-05-23T12:19:55Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजपने यापूर्वी मला धोकाच दिला !

Advertisement


कोल्हापूर : भाजपने यापूर्वी मला धोकाच दिला आहे. लोकसभेला जागा दिली नव्हती. आता लोकसभेसाठी चार जागा सन्मानपूर्वक द्याव्यात अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे. महादेव जानकर यांच्या मागणीनंतर भाजप काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार  आहे. सध्या जानकर हे कोल्हापूर, सांगली सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना नागरिकांकडून 55 हजार रुपयांच्या दोनशे थैल्या भेट देण्यात आल्या आहेत. 
दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील जागा वाटपावरून बेबनाव असल्याचं समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये ठाकरे गटानं वीस जागांवर दावा केल्याची माहिती समोर येत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून समान जागा वाटपाचा दावा करण्यात येत आहे.