Advertisement
पुणे : ईडी कार्यालयात सोमवारी जयंत पाटील हे चौकशीसाठी हजर झाले होते. चौकशीला हजर होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जयंत पाटील यांना फोन करून त्यांची चौकशी केली. दुसरीकडे मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जयंत पाटील यांना फोनही न केल्यानं चर्चेला उधाण आलं होतं. अखेर जयंत पाटील यांना फोन का केला नाही याबाबत आता खुद्द अजित पवार यांनीच खुलासा केला.
जयंत पाटील यांना फोन केला नाही याचा विपर्यास करण्यात आला. यापूर्वीही अनेक राष्ट्रवादींच्या नेत्यांची चौकशी झाली, पण मी तेव्हाही कोणाला फोन केला नाही. मी कुठल्याच नेत्याच्या चौकशीवेळी काही बोललो नाही. काही स्टेटमेंट दिलं नाही. माझ्या कामाच्या 22 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे मी कोणत्याही नेत्यांच्या कारवाईबद्दल प्रतिक्रिया देत नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
