#

Advertisement

Friday, May 5, 2023, May 05, 2023 WIB
Last Updated 2023-05-05T11:16:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला : प्रफुल्ल पटेल

Advertisement

मुंबई :  राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवड समितीनं शरद पवारांचा राजीनामा फेटाळला आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंत केली आहे. त्यानंतर पवार यांनीही विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. 
राष्ट्रवादीच्या बैठकांचं सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एका मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली.  आज राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील नेत्यांसोबत चर्चा झाली. शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये राजीनामा देण्याची घोषणा केली. पण, यावर अनेक मान्यवरांनी आपला भावना व्यक्त केली. त्याबद्दल आम्ही प्रस्ताव मांडला. आम्ही सगळ्यांनी त्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली आहे' असं पटेल यांनी सांगितलं. शरद पवार यांना आम्ही राजीनामा मागे घेण्यास विनंती केली आहे. ते आमचे नेते आहे, लगेच ते उत्तर देणार नाही. त्यांनी आणखी वेळ मागितला आहे. आम्हाला काही निरोप मिळाला, तर त्याबद्दल माहिती देऊ, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.