#

Advertisement

Wednesday, May 31, 2023, May 31, 2023 WIB
Last Updated 2023-05-31T10:59:07Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

जागा वाटप..., ठाकरे गट आणखी दोन पाऊलं मागं?

Advertisement

मुंबई  : महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून बिघाडी होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून 18 जागांवर दावा करण्यात आला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा फॉर्म्यूला समोर ठेवण्यात आला आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभेच्या जागा वाटपाबाबत एकच बैठक झाली. जेवढ्या जागा आम्ही जिंकलो होतो तिथे उमेदवार तयार आहेत. उर्वरीत जागांबाबत चर्चा होईल. तिन्ही पक्षात प्रत्येकी 16 जागांच्या वाटपाचा प्रस्ताव कधी समोर आलाच नाही. आमचे 19 खासदार आहेत, मात्र एखाद्या जागेवर आमचा उमेदवार कमजोर असेल आणि तीथे महाविकास आघाडीतील दुसऱ्या घटक पक्षाचा ताकदवर उमेदवार असेल तर चर्चा करू, तो मोठेपणा उद्धव ठाकरे यांनी दाखवल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.