#

Advertisement

Wednesday, May 31, 2023, May 31, 2023 WIB
Last Updated 2023-05-31T10:52:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

"मविआ"तील जागा वाटपाबाबत आता पवारच मार्ग दाखवतील !

Advertisement

पुणे : महाविकास आघाडीमध्ये कोणती जागा कोण लढेल याचा आढावा शरद पवारांनी घेतला आहे. त्या मतदारसंघात असलेली पक्षाची आणि उमेदवाराची ताकद जागा वाटप करताना लक्षात घेतली जाईल तसेच सर्व्हेनुसार आमच्या 36 जागा निवडून येतील असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीतील लोकसभेच्या जागा वाटपावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हाविकास आघाडीमध्ये कोणती जागा कोण लढेल याचा आढावा शरद पवारांनी घेतला आहे. त्या मतदारसंघात असलेली पक्षाची आणि उमेदवाराची ताकद जागा वाटप करताना लक्षात घेतली जाईल. पराभव कोणाचा करायचा हे ठरवून केलं जाऊ शकतं. मात्र जिंकून कोण येईल त्याला ताकद द्यावी लागणार आहे. मविआतील जागा वाटपावर मोजक्या लोकांनी बोललं पाहिजे. यातून आता शरद पवारच मार्ग काढलीत, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.