Advertisement
पुणे : खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी गौतमी पाटीलची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केली होती. यावर आता शिवसेनेचे शिरुरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पलटवार केला आहे.
शिरुरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी दिलीप मोहिते पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, "तो वेड्यांच्या नंदनवनात जगतो. त्याला ही तुलना करणं शोभत नाही. महाराष्ट्र हे सहन करणार नाही. त्यांनी भानात राहून वक्तव्य करावे, आम्ही सुद्धा गौतमीची तुलना शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत करू शकतो. पण आम्ही पवारांना मानणारे आहोत. आम्ही तसं करणार नाही, अशा शेलक्या शब्दात शिवाजी आढळराव यांनी मोहिते पाटलांचा समाचार घेतला.
गौतमीच्या कार्यक्रमात पाऊसाने ख्वाडा...
खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त (29 मे) चाकणमधील मोई येथे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, कार्यक्रमावेळीच वादळी वाऱ्यासह पाऊसाची तुफान बँटिंग सुरू असल्याने गौतमीच्या कार्यक्रमाला पाऊसाने राडा केला. सात वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार असली तरी सध्या कार्यक्रमस्थळी तुफान पाऊस सुरू असुन सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने गौतमीच्या कार्यक्रमात पाऊसाने ख्वाडा घातला.
