Advertisement
मुंबई : मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या 7 जूनला राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रीपद मिळवण्यासाठी आमदारांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात नाराजांना संधी मिळणार? शिंदे गट आणि भाजप यांच्यात कुणाला मंत्रीपद मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून भरत गोगावले, संजय शिरसाठ, प्रकाश आबिटकर, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर अपक्ष आमदार बच्चू कडूंनी मंत्रिपद मिळू शकतं. याशिवाय मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेकांचं मंत्रीपदाचं स्वप्न साकार होऊ शकतं. भाजप आणि शिंदे गटाला किती मंत्रीपदं मिळणार, अद्याप गुलदस्त्यात आहे.
मंत्रिपदाचा फॉर्म्युला आधीच ठरला असल्याचे समजते. मंत्रिपदाच्या संधीसाठी परफॉर्मन्स फॉर्म्युला वापरण्यावर शिंदे आणि फडणवीस यांचं एकमत झाल्याचीही माहिती आहे. विभागीय निकषांसोबतच मंत्री म्हणून काम करण्याचा आवाका किती याचाही विचार करून मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल अशी सूत्रांची माहिती आहे. दीड पावणे दोन वर्षातच लोकसभा निवडणूक येत आहे. त्यानंतर सहा महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे कमी कालावधीत तगदा परफॉर्मन्स मंत्र्यांना दाखवावा लागणार आहे.
