#

Advertisement

Tuesday, May 23, 2023, May 23, 2023 WIB
Last Updated 2023-05-23T16:54:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

'शिंदे-फडणवीस' सरकार मंत्रिमंडळ विस्तार याच महिन्यात

Advertisement


मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मोकळा झाला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्याच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांची यादी तयार आहे. भाजपकडून हिरवा कंदील येताच मंत्रिमंडळ विस्तार या महिन्यात होण्याची शक्यता आहे. 
मंत्रिमंडळ विस्तारातील अडचणी दूर झाल्या आहेत, मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत, जे मंत्रिपद मिळेल त्याला पूर्ण न्याय देऊ, असं शिवसेना नेते भरत गोगावले म्हणाले आहेत. तर म्हणजे होईल. माझं नाव दरवेळी चर्चेत असतं, असं सूचक विधान संजय शिरसाठ यांनी केलं आहे. दुसरीकडे या महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.