#

Advertisement

Friday, May 5, 2023, May 05, 2023 WIB
Last Updated 2023-05-05T11:49:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार आजच निर्णय घेणार?

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षदी राहायचं की नाही याबाबत शरद पवार आजच निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या समितीनं पवारांचा राजीनामा नामंजूर केल्यानंतर आता पवार काय निर्णय घेतात याकडेच सर्वांचं लक्ष लागल आहे.
राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. त्यानंतर एकमतानं केलेला हा ठराव पवारांकडे पाठवण्यात आला. समितीने केलेला ठराव त्यांच्यासमोर सादर करण्यात आला. या ठरावावर आता शरद पवार विचार करणार आहेत अशी माहिती पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती. आता पाच वाजता शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. आजच शरद पवार आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.