#

Advertisement

Friday, May 19, 2023, May 19, 2023 WIB
Last Updated 2023-05-19T11:55:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

वड आणि सावली...

Advertisement

 



मंगळवेढा : सोलापूर जिल्ह्याचे शब्दप्रभू अर्थातच माजी आमदार, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचा वाढदिवस मंगळवेढ्यात गुरूवारी (दि. 18) मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी विविध समाजोपयोगी तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. ढोबळे यांच्या कन्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी या सर्व कार्यक्रमांची धुरा सांभाळली. सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रा. लक्ष्मणराव यांना शुभेच्छा देण्यासाठी मंगळवेढ्यात उपस्थिती लावली होती. संपूर्ण दिवसभर सुरू असलेल्या स्थानिक कार्यक्रमांना ऍड. कोमलताई यांनी हजेरी लावताना सायंकाळी आयोजीत केलेल्या विशेष सत्कार समारंभात ऍड. कोमलताई या वडिलांच्या सोबत होत्या, "साहेबां'ना लागणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टींची काळजी त्या घेत असल्याचे सर्वांनीच पाहिले. वडिलांच्या वाढदिनी त्यांना स्वत: हाताने केक भरविणाऱ्या या कन्येला किती मोठे कौतूक असल्याचे स्पष्ट दिसत होते. वडिलांनी केलेली सूचना अगदी आपल्या तळहातावर लिहताना, तळहातावरच्या फोडा एवढं जपलेल्या या कन्येचे किती किती कौतूक "साहेबांना' वाटले, हे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. वाढदिवसाच्या विशेष सन्मान सोहळ्यात "साहेब' आणि "ताई' यांचे वड आणि सावलीचे नाते सर्वांनीच डोळ्यात साठवूण घेतले.