#

Advertisement

Friday, May 19, 2023, May 19, 2023 WIB
Last Updated 2023-05-19T16:43:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पुन्हा नोटबंदी ! 2000 हजारांची नोट बँकेत बदलायला जा?

Advertisement

नवी दिल्ली : आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तुमच्याकडे 2 हजार रुपयांच्या नोटा असतील तर त्या तुम्हाला बँकेत जाऊन बदलाव्या लागणार आहेत. आरबीआयने शुक्रवारी परिपत्रक काढून 2 हजार रुपयांच्या नोटा बंद करत असल्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर 2016 साली 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या.
2 हजारांच्या नोटा आरबीआय अॅक्ट 1934 सेक्शन 24 (1) अंतर्गत आणल्या गेल्या होत्या. जुन्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नोटांची तूट होऊ नये म्हणून 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या. दुसऱ्या नोटा बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर 2 हजार रुपयांच्या नोटांचं उद्दीष्ट संपलं होतं, त्यामुळे 2018-19 सालीच 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद झाली होती. 

कशा बदलाल नोटा?
आरबीआयच्या परिपत्रकानुसार 2 हजार रुपयांच्या नोटा तुमच्या बँकेत जाऊन जमा करता येतील किंवा या नोटांच्या बदल्यात दुसऱ्या नोटाही घेता येतील. 23 मे 2023 पासून बँकेत जाऊन 2 हजार रुपयांच्या नोटा बदलता येईल, पण एकावेळी फक्त 20 हजार रुपयेच जमा करता येणार आहेत.