#

Advertisement

Thursday, June 1, 2023, June 01, 2023 WIB
Last Updated 2023-06-01T11:06:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंकजा मुंडे यांनी निर्णय घेण्याची वेळ : संजय राऊत

Advertisement

मुंबई  : भाजपवर गंभीर आरोप करत पंकजा मुंडे यांनी परिणामाची चिंता न करता निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी शुन्यातून पक्ष मोठा केला. मात्र आज मुंडेंचं अस्तित्व राहू नये यासाठी भाजपमधून प्रयत्न होत आहेत. मुंडे कुटुंबाची राजकारणात वाताहत करण्याचा हा प्रयत्न आहे. आमच्यावर अन्याय होतोय या रडगाण्याला कोणी विचारत नाही, त्यामुळे आता पंकजा मुंडे यांनी कोणत्याही परिणामाची चिंता न करता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी देखील सूचक वक्तव्य केलं होतं. बहिण- भावांमध्ये जवळीक वाढत आहे. तुम्ही भविष्यात कमळ हाती घेणार का? असा प्रश्न धनंजय मुंडे यांना विचारला असता, तुम्ही त्यांना विचारा ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार का असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं.