#

Advertisement

Saturday, June 10, 2023, June 10, 2023 WIB
Last Updated 2023-06-10T11:02:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजितदादांना जबाबदारी दिली नाही...कारण...

Advertisement

पुणे : राष्ट्रवादीचा 24 व्या वर्धापन दिनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांच्याकडे जबाबदारी का देण्यात आली नाही, याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मोठा खुलासा केला आहे. अजित पवार यांना केंद्रामध्ये जाण्याची इच्छा नाही, त्यांना राज्यात काम करायचं आहे, त्यामुळे त्यांच्यावर इतर राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली नसावी असं अंकुश काकडे यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्याकडे राज्यात मोठी जबाबदारी असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत