#

Advertisement

Saturday, June 10, 2023, June 10, 2023 WIB
Last Updated 2023-06-10T11:08:55Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया ....

Advertisement

मुंबई :  राष्ट्रवादीच्या 24 व्या वर्धापन दिनी शरद पवार यांनी  सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही.
कार्यकारी अध्यक्षपदाची घोषणा होताच सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत सर्वांचे आभार मानले आहेत. 'माझ्याकडे  कार्यकारी अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिल्याबद्दल मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. पवार साहेब, सर्व ज्येष्ठ नेते, पक्षाचे सहकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे आभार मानते. पक्षातील सर्व कार्यकर्ते ज्यांच्यामुळे आपण हा पल्ला गाठू शकलो. त्यांच्यासोबत काम करून , राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी मजबूत करण्यासाठी मी  परिश्रमपूर्वक काम करेल' असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.