Advertisement
मुंबई : शिवराज्याभिषेकाला आता तब्बल 350 वर्ष पूर्ण होत असल्याने आता शिवभक्तांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. अशातच आता तारखेआधी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार खडाजंगी सुरू झाल्याचं समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर ट्विट करत जोरदार टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक हा दिनांक 6 जून, 1674 रोजी झाला. इथं मात्र निवडणूकांचं गणित समोर मांडून राज्याभिषेक साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता. शिवराज्याभिषेक दिनाची तारीख जगामध्ये सगळ्यांना माहित आहे ती 6 जून, 1674 आहे. याचाच अर्थ 350 वा शिवराज्याभिषेक दिन हा 6 जून, 2024 रोजी आहे. मग आज आज शिवराज्याभिषेक साजरा करण्याचा विचार कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडला?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
