#

Advertisement

Friday, June 2, 2023, June 02, 2023 WIB
Last Updated 2023-06-02T12:58:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिरूरमधून अनेकजण निवडणूक लढवण्यास इच्छूक !

Advertisement


पुणे : राष्ट्रवादीचे भोसरी मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे यांच्याकडून देखील शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाला मिळणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिरूरच्या जागेवर विलास लांडे यांनी दावा केला आहे. तर दुसरीकडे अमोल कोल्हे यांनी देखील या मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून नेमकं कोण निवडणूक लढवणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत अजित पवार यांना विचारले असता, शिरूरमधून अनेकजण निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत, त्यामुळे त्यात काही वावगं नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.