#

Advertisement

Saturday, June 3, 2023, June 03, 2023 WIB
Last Updated 2023-06-03T10:21:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंकजा मुंडे घेणार एकनाथ खडसे यांची भेट

Advertisement


मुंबई :  माजी मंत्री पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच त्या राष्ट्रवादीत जातील, अशीही चर्चा सुरु आहे. परंतु पंकजा मुंडे यांच्याकडून काहीही तसा दुजारो मिळालेला नाही. असे असताना त्यांची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे. पंकजा भाजपमध्ये नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांत राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे./भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या असतानाच  एकनाथ खडसे आज त्यांची भेट घेणार असल्याने या भेटीची मोठी उत्सुकता आहे. दिल्लीत एका कार्यक्रमाच्यावेळी पंकजा मुंडे यांनी धक्कादायक विधान केले होते. 'मी भाजपची असले, तरी भाजप माझा पक्ष नाही' असे म्हटले होते. यावरुन पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. पंकजा यांच्या विधानानंतर एकनाथ खडसे यांनी पंकजा यांचे विधान दुःखद आणि वेदनादायी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज एकनाथ खडसे  पंकजा यांची भेट होत आहे. त्यामुळे या भेटीवर तर्कवितर्क लावले जात आहेत.