#

Advertisement

Saturday, June 3, 2023, June 03, 2023 WIB
Last Updated 2023-06-03T10:35:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादी शिरुरमध्ये भाकरी फिरवणार? अजित पवारांनीही टाकली गुगली

Advertisement


मुंबई : राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि अजितदादांचे खास... विलास लांडेंच्या वाढदिवसानिमित्त भोसरीत भावी खासदार अशी पोस्टर्स लागली अन् शिरुरमध्ये अमोल कोल्हेंच्या जागी राष्ट्रवादी भाकरी फिरवणार का? अशी चर्चा अचानक सुरु झाली. अमोल कोल्हेंच्या जागेवर आपण इच्छुक असल्याच्या चर्चांना खुद्द लांडे यांनीच दुजोरा दिला. त्यात आता अजित पवारांनीही शिरुरवरुन गुगली टाकलीय. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.महाविकास आघाडीत कुठल्या जागा कोणाला वाट्याला येतात, हे प्रथम निश्चित होईल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या जागेवर सक्षम उमेदवार दिला जाईल, असं अजित पवार म्हणाले. 
विलास लांडे पक्षाचे माजी आमदार आहेत. त्यांना खासदारकीची उमेदवारीही दिली होती. त्यावेळी त्यांना अपशय आले होते. त्यांनी आता गोळाबेरीज आणि आकडेमोड केली असेल, असंही अजित पवार म्हणाले आहेत. शिरुरच्या लोकसभा सीटवर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी आमदार विलास लांडे यांची नावे चर्चेत आहेत.
आता फक्त अजित पवारांच्या दाव्यामुळेच कोल्हे गॅसवर नाहीत. अजित पवारांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी चांगल्या उमेदवाराचा उल्लेख करत सस्पेन्स आणखी वाढवला. त्यामुळे आता शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाकरी फिरवणार का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.