#

Advertisement

Thursday, June 1, 2023, June 01, 2023 WIB
Last Updated 2023-06-01T11:28:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार ?

Advertisement

मुंबई  : भाजपवर  पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा जोरात आहेत.. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या विधानाने नवीच चर्चा सुरु झालीय.. पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीत येण्याचा विचार केल्यास त्यावर विचार करु असं अनिल देशमुख म्हणालेत. तेव्हा पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर आहे का, पंकजा राष्ट्रवादीत जाणार का याचीच चर्चा सुरु झाली आहे. 
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा नाराजी उघडपणे बोलून दाखवलीय. मी भाजपची पण भाजप माझी थोडीच आहे. असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलंय. गोपीनाथ मुंडेंनी पक्षासाठी खूप काम केलं. त्यामुळेच आज सरकार पाहायला मिळतंय असंही त्यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.