Advertisement
सोलापूर : सोलापुरची चादर आणि भाकरी-चटणी "वर्ल्ड फेमस' आहे. निर्यातक्षम कापड तयार करण्याची ताकद आपल्या सोलापुरातील कामगारांकडे आहे. परंतु, कुठेतरी आपण आधुनिकता स्विकारायला हवी, विमानतळासारखे प्रकल्प पूर्ण झाले तर सोलापुरातून होणारी थेट निर्यात वाढू शकेल, सोलापूरचे आधुनिक औद्योगिरीकरण होणेही गरजेचे आहे, असे सांगताना बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी उपस्थित राजकाणाऱ्यांना न कळतपणे चांगल्याचा कानपिचक्या घेतल्या. तर, यावेळी व्यासपिठावरील एका छायाचित्रात ऍड. कोमलताई या माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मागे उभ्या असल्याने त्यांनी शिंदे यांना "पाठिंबा' दिल्याची चर्चा समारंभात चांगलीच रंगली होती. यावर कार्यक्रमानंतर त्यांना विचारले असता हा पुरस्कार आमचे साहेब, माझी खरी "पॉवर' लक्ष्मणराव ढोबळे यांना समर्पित असल्याचे सांगत राजकीय चर्चेतील हवाच काढून टाकली.
दरम्यान, सोलापूर दैनिक 'पुण्यनगरी'च्या वर्धापनदिनी "द पॉवर ऑफ सोलापूर' पुरस्काराने ऍड. कोमलताईंचा सन्मान करण्यात आला. यावेळी सन्माला उत्तर देताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, पुण्यनगरीला महाराष्ट्रातील लोकप्रिय दैनिक करण्यात स्व. बाबासाहेब शिंदे यांचे मोठे योगदान आहे. पत्रकारिता क्षेत्रात बाबा हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व समजले जाते. बाबांनी आपल्या वर्तमान पत्राच्या पानांत सर्वसामान्यांच्या वेदनांना स्थान दिले. यामुळेच पुण्यनगरी हे वर्तमान पत्र सामान्यांना आपले वाटते, हेच या दैनिकाच्या यशामागील मर्म आहे. आज बाबा आपल्यात नसले तरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे चिरंजीव अरविंद शिंगोटे आणि शिंगोटे बंधू यांनी त्यांचा वारसा जपला आहे. सोलापुरातील उल्लेखनीय व्यक्तींच्या कामाची दखल घेत त्यांना पुरस्काराने सन्मानित करणे हा एक चांगला उपक्रम राबविला जात आहे, अशा उपक्रमांतून इतरांचे मोठेपण सांगायलाही मनाचा मोठेपणा लागतो तो शिंगोटे कुटंबाकडे आहे. आज, या ठिकाणी विविध क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराच्या नावातच ताकद आहे, अशा शब्दांत ऍड. कोमलताईंनी या उपक्रमाचे कौतूक केले, त्यांनी यावेळी आपले वडील "शब्दप्रभु' लक्ष्मणराव ढोबळे यांच्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे उद्योग, व्यापारी, धार्मिक, ऐतिहासीक आदी अनुषंगाने मार्गदर्शन करीत मला विश्वास आहे आपल्या जिल्ह्यातील माणसं सोलापूरचा परिपूर्ण विकास करू शकतात, आज पुण्यानगरीने निवडलेली माणय हिच सोलापूरची ताकद असल्याचे सांगत व्यासपीठावरील मान्यवर तसेच उपस्थितांची मन जिंकले.यावेळी सोलापूर जिल्ह्यातील 11 कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला यामध्ये सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे, जकराया मल्टिस्टेटच्या सीइेओ मनीषा जाधव, कमर्शिअल पायलट एअर नॉर्थ कॅनडाच्या ऋतुजाताई राजन पाटील, अभिनेत्री रिंकू राजगुरु, शास्त्रज्ञ रिसर्च कन्टन्ट डेव्हलपर इन स्पश नेशन, मिडलॅन्डच्या श्रेया माने, भारतीय महिला (अंध) क्रिकेट संघाची खेळाडू गंगा कदम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार, शिवशंकर मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या चेअरमन डॉ. स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते-पाटील, महालक्ष्मी महिला पापड गृहउद्योगच्या चेअरमन संपदा डोंगरे, कृषीनिष्ठ महिला शेतकरी संख्याताई सुरेश वाघ यांना "पॉवर ऑफ सोलापून वूमन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. सुशीलकुमार शिंदे, माजी सहकारमंत्री सुभाषबापू देशमुख, आमदार शहाजीबापू पाटील, पुण्यानगरीचे संचालक संपादक अरविंद शिंगोटे, समूह सल्लागार शशिकांत बोहाडे, सरव्यवस्थापक मंगेश कांचन, विभागीय व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी, पुणे संपादक श्रीकांत साबळे, सोलापूर वृत्त संपादक रघुवीर शिराळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
