Advertisement
संभीजनगर : ग्रामपंचायत निवडणुकीतून BRSनं महाराष्ट्रात खातं उघडल आहे. गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ ग्रामपंचायतीमध्ये BRSचा उमेदवार विजयी झाला. गफूर सत्तार पठाण 115 मतांनी विजयी झाले आहेत. BRS अर्थात भारत राष्ट्र समिती हा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा पक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून केसीआर सातत्यानं महाराष्ट्रात सभा घेत आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं BRSचा महाराष्ट्रात प्रवेश झाला. मराठवाड्याच्या मार्गानं KCR यांचा BRS पक्ष महाराष्ट्रात प्रवेश करतोय. राज्यभरात अनेक ठिकाणी पक्ष कार्यलय सुरु करत BRS पक्ष महाराष्ट्रात हात पाय पसरत आहे.
