#

Advertisement

Friday, June 23, 2023, June 23, 2023 WIB
Last Updated 2023-06-23T11:06:26Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"बीआरएस"ला हलक्यात घेऊ नका : अजित पवार

Advertisement

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती बीआरएसनं महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांचे कान टोचताना बीआरएसला हलक्यात घेऊ नका असं म्हटलं आहे. यावरूच विरोधक देखील बीआरएसबाबत सावध भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे.
राज्यात सर्व पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जागा वाटपाबाबत युती आणि महाविकास आघाडीमध्ये बैठका सुरू आहेत. घटक पक्षांकडून आपल्या वाट्याला येणाऱ्या संभाव्य जागांचा आढावा देखील घेण्यात येत आहे. यावेळची लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठी चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, यावेळी भारत राष्ट्र समिती बीआरएसनं महाराष्ट्रात एन्ट्री घेतली आहे.