#

Advertisement

Monday, July 10, 2023, July 10, 2023 WIB
Last Updated 2023-07-10T12:24:44Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात 31 जुलैला सुनावणी

Advertisement

मुंबई :  शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात 31 जुलैला सुनावणी होणार आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय रद्द करावा अशी याचिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केली होती. त्यावर आता सुप्रीम कोर्टात 31 जुलैला सुनावणी होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले होते. त्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार आक्षेप घेतला होता, मात्र त्याला यश आले नाही. यापूर्वी 22 फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाने शिंदे आणि निवडणूक आयोगाला ठाकरे यांच्या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे समन्स बजावले होते आणि तीन आठवड्यांनंतर हे प्रकरण सूचीबद्ध करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर, एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या आणि त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला, परंतु त्याला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस बजावली.