Advertisement
बारामती : विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता त्यांनी त्यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांच्या विरोधात बारामतीमधून कोणीही निवडून येऊ शकत नाही. मला तिकीट दिलं तरी मी लढणार नाही. अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बारामतीकर नाराज आहेत. मात्र तरीही मतदान दादांनाच होणार आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की अजित पवार यांच्याकडे सर्वाधिक पोटेंशिइल आहे. भाजपवाले लोकनेत्यांना जवळ घेतात आणि नंतर त्यांना संपवतात. मला भीती वाटते की भाजपवाले अजित पवार यांची देखील ताकद कमी करतील.
