#

Advertisement

Monday, July 24, 2023, July 24, 2023 WIB
Last Updated 2023-07-24T11:17:16Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सिन्नर टोलनाका तोडफोड प्रकरणात मोठी अपडेट; 8 जणांना अटक

Advertisement

नाशिक  :  मनसे नेते अमित ठाकरे यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली होती. या प्रकरणी समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीनं वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली  होती. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात 15 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर  वावी पोलिसांनी 14 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, आता यातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
मनसे कार्यकर्त्यांकडून टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली होती. या तोडफोडीमध्ये जवळपास पाच लाखांचं नुकसान झाल्याचा दावा समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला आहे. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली  होती. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी 15 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला.   14 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, त्यापैकी आता आठ जणांना आता अटक करण्यात आली आहे.