Advertisement
पुणे: अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
राज्याच्या सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो तेव्हा मुख्यमंत्रीपदावर स्पष्टता झाली आहे. आम्ही एनडीएचा घटक आहोत. मुख्यमंत्रीपद दादांना मिळावं, अशी राज्यातील अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आणि अपेक्षा आहे. मात्र आता आम्ही महायुती उभी केली आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदाचा विषयच नाही,' असं सुनिल तटकरे म्हणाले आहेत संजय राऊत, विनायक राऊत यांनी काय म्हणावं आणि त्यावर मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही. टीका टिप्पणीपासून अलिप्त राहणं आणि राज्याच्या विकासाला आम्ही प्राधान्य देणार आहोत,' अशी प्रतिक्रिया सुनिल तटकरे यांनी दिली आहे..
