Advertisement
रत्नागिरी : मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत.ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र यावं असा सूर गेल्या काही दिवसांपासून मनसे कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. यावर राज ठाकेर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांना युतीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मी एकला चलोची भूमिका घेणार आहे. लोकसभा विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याची मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे.
