#

Advertisement

Friday, July 14, 2023, July 14, 2023 WIB
Last Updated 2023-07-14T10:21:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार यांना विठ्ठल, पांडुरंग म्हणणे थांबवा !

Advertisement

बडव्यांचा उल्लेख करू नका; वैदिक धर्मसभेचा इशारा 

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षातील दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यात अध्यक्ष शरद पवार हे आमचे विठ्ठल आणि पांडुरग असल्याचं म्हणत त्यांना बडव्यांनी घेरलं असल्याचा आरोपही केला गेला. दरम्यान, यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वैदिक धर्मसभेने इशारा दिला आहे. शरद पवार यांना विठ्ठल, पांडुरंग संबोधल्यास आंदोलन करू असं वैदिक धर्मसभेने म्हटलं आहे. शरद पवार यांना विठ्ठल, पांडुरंग संबोधले तर आम्ही आंदोलन करू. शरद पवार यांना विठ्ठल म्हटल्यानं देवतांचा अपमान होतो. त्यामुुळे पवार यांना विठ्ठल, पांडुरंग म्हणणे तात्काळ थांबवा असं वैदिक धर्मसभेने म्हटलं आहे. शरद पवार यांचे आराध्य असलेले फुले, शाहू, आंबेडकर या नावाने त्यांना संबोधले तर आमची काही हरकत नाही असंही वैदिक धर्मसभेने म्हटलं.