Advertisement
मुंबई : भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. सिन्नरमधील टोलनाक्यावर अमित ठाकरेंची कार थांबवल्याने टोलनाका फोडल्याच्या विषयावरुन भाजपाने टीका केली आहे. भाजपाने संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ पोस्ट करत, "कोणा एका नेत्यासाठी किंवा त्याच्या मुलासाठी इथे वेगळे नियम पाळले जाणार नाहीत," असं म्हणत अमित ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. दादागिरी भाजपा सरकार चालू देणार नाही, असं म्हणत अमित ठाकरेंसाठी झालेल्या टोलनाका तोडफोड प्रकरणावरुन महाराष्ट्र भाजपाने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे\
भाजपाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. "अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा," अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ भाजपाने शेअर केला आहे. या व्हिडीओच्या थम्बनेलला अमित ठाकरेंचा विचार करतानाचा फोटो, बॅकग्राउण्डला टोलनाक्याची तोडफोड झाल्याचा फोटो वापरण्यात आला आहे. या फोटोवर 'फोडणं सोपं आहे हिंमत असेल तर बांधून दाखवा,' असं वाक्य लिहिलेलं आहे.
