Advertisement
धुळे : शिरपूर येथे अल्पवयीन
मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशी द्या, अशी संतप्त मागणी मातंग समाजाकडून
करण्यात आली आहे. या घटनेनंतर समाजात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करीत
बहुजन रयत परिषदेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाला निवेदन
देण्यात आले असून संबंधीत नराधमास फाशीचीच शिक्षा करा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अत्याचार करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा अथवा देहदंडाची शिक्षा
करण्यात यावी. राज्य शासनाने या खटल्यात विशेष सरकारी वकील सरकारी वकील म्हणून ऍड.
उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. पीडितेसह तिच्या कटंबियांना आर्थिक मदत करण्यात
यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या
निवेदनावर बंडू गांगुर्डे, रविंद्र वाकळे, संदिप पवार, दिलीप बागुल, तुषार ससाणे,
आकाश बागुल, गोकूळ संदानशिव, विवेक खैरनार, मुरलीधर जाधव, राम प्रसाद साबळे, चंदू
कांबळे, विक्की थोरात, कृष्णा म्हस्के आदींची नावे आहेत.
