#

Advertisement

Saturday, July 29, 2023, July 29, 2023 WIB
Last Updated 2023-07-29T10:57:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माजी मंत्री ढोबळे यांचे थेट मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन

Advertisement

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सवासाठी संपूर्ण ऑगस्ट महिना रात्री 12:00 वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी मिळावी

मुंबई : माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी थेट मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सवासाठी संपूर्ण ऑगस्ट महिना रात्री 12:00 वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात माजीमंत्री ढोबळे यांनी म्हटले आहे की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची यावर्षी 103वी जयंती साजरी होत आहे. अण्णा भाऊ साठे यांना दैवत मानणारा मातंग समाज महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहे. या समाजाच्या वतीने दि. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने सर्व समाजबांधव एकत्र येतात. विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे हा फक्‍त उत्सव नसून तो लोकोत्सव बनला आहे, असा हा लोकोत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण ऑगस्ट महिना रात्री 12:00 वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी मिळावी, अशा मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्विकारले असून यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिल्याचे ऍड. कोमलताई यांनी सांगितले.