#

Advertisement

Friday, July 14, 2023, July 14, 2023 WIB
Last Updated 2023-07-14T11:18:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

संत गाडगेबाबा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवली निसर्ग यात्रा

Advertisement

तुळजापूर : मंगरूळ (ता. तुळजापूर) येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या निसर्ग सहलीचे आयोजन मौजे मंगरूळ येथील श्रद्धास्थान असलेल्या गैबीपीर या ठिकाणी करण्यात होते. शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार या निसर्ग यात्रा-सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी निसर्गातील मुक्‍त वातावरणाचा आनंद घेतला. हिरवाईमध्ये विद्यार्थी दंग झाले होते. विद्यार्थ्यांनी श्रद्धास्थान गैबीपीर येथील माहिती जाणून घेतली तसेच श्रमदानाचा उपक्रमही राबविला गेला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटपासह वनभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, शाळेतर्फे अशा उपक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते.