Advertisement
मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना लवकरच पूर्ण विराम लागण्याची शक्यता आहे. राजभवनात मंत्रीमंडळ विस्ताराच्या शपथ विधीची तयारी पूर्ण झाली असल्याची बोलले जात आहे. एवढेच नाही तर राजभवनातील दरबार हॉल शपथविधीसाठी सज्ज आसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.. लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार हे नक्की.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथविधी घेऊन ११ दिवस उलटले तरीही खातेवाटप रखडलंय. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली. हा खातेवाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज रात्री जाण्याची दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खातेवाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारीच सुटणार असल्याचं दिसतं आहे.
