Advertisement
नवी दिल्ली : राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत किती जागा जिंकायच्या याचं टार्गेटही ठरवलेलं आहे. मात्र, काँग्रेसनेही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान देण्याचं ठरवलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वाराणासीतून गांधी कुटुंबातील व्यक्तीच उभा करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. गांधी घराण्यातील जी व्यक्ती वाराणासीतून लढणार आहे, त्या व्यक्तीची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे गांधी घराण्यातील या व्यक्तीला मतदारांची सहानुभूती मिळू शकते. त्यामुळे मोदी यांच्यासाठी 2024ची लोकसभा निवडणूक जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अजय राय यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे पुन्हा एकदा अमेठीतून लढणार असल्याचं अजय राय यांनी सांगितलं. त्यामुळे राहुल गांधी यांची लढत अमेठीच्या विद्यमान खासदार स्मृती ईराणी यांच्याशी होणार आहे. तर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या वाराणासीतून निवडणूक लढणार आहेत.
