#

Advertisement

Tuesday, August 8, 2023, August 08, 2023 WIB
Last Updated 2023-08-08T13:28:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजपच्या नेत्या सना खान 8 दिवसांपासून बेपत्ता

Advertisement

नागपूर : भाजपच्या नेत्या सना खान एक ऑगस्टपासून बेपत्ता आहेत. त्यांना जबलपूर येथील एकाने जीवे मारण्याची धमकी दिली होती. जबलपूरला गेल्यानंतर दोन दिवसांनंतर त्यांचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे सना खानच्या आईने पोलीस मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हापासून पोलीस सना खान यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान जबलपूर येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची चर्चा सुरू झाली. त्याची पुष्टी अद्याप नागपूर पोलिसांनी केलेली नाही. यासंदर्भात झोन दोनचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी देखील हे वृत्त सध्या निराधार आल्याचं म्हंटलं आहे. शहर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक महिला नेत्या सना खान गेल्या ८ दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे नागपूर पोलिसांच्या हाती लागले आहे. सना खान यांच्यासोबत घातपात झाला, अशी चर्चा नागपूर सुरू झाली आहे. मात्र, नागपूर पोलिसांनी यासंदर्भातील वृत्त फेटाळून लावले. पोलीस उपायुक्त राहुल मदने म्हणाले, सना खान यांचा शोध जबलपूर पोलिसांच्या मदतीने सुरू आहे. ज्या व्यक्तीसोबत गेल्याचा संशय आहे तोही व्यक्ती फरार आहे. त्या कुणाच्या सोबत गेल्याचा संशय आहे.