Advertisement
मोहोळ : लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांना जयंती तसेच लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी निमित्त स्वामी
विवेकानंद विद्यालय व प्राथमिक शाळेमध्ये वंदन करण्यात आले कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका मुक्ताबाई पवार होत्या. अध्यक्ष व उपस्थित
मुख्याध्यापक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी उर्मिला भिसे,
सिद्धेश्वर वाघमोडे, मुख्याध्यापक सुधीर नाईकनवरे, मुख्याध्यापक रामेश्वर भोसले,
पवार मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली. आठवी
नववीतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांवर गीत सादर केले. यावेळी मुख्याध्यापक
रामेश्वर भोसले व सुधीर नाईकनवरे, गजाला खान, महादेवी राजमाने, सिध्देश्वर वाघमोड,
संजय वाघमोडे, प्रमोद कोरे, वैशाली वाघमोडे, मनीषा होमकर, श्री जंगलगी, उर्मिला
भिसे, धनाजी माने, शशी अष्टुळ, ज्ञानदेव डोलारे, राजू भोसले, गौरव कांबळे, मोहन
हजारे आदी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद कोरे यांनी केले.